Padadyamagach
Padadyamagach

Padadyamagach

लॉकडाउन जाहीर होऊन दोन महिन्यांहून अधिक काळ उलटला. साधारण सव्वा महिन्यापूर्वी माझ्या डोक्यात 'पडद्यामागचं' ही कल्पना आली आणि ती प्रत्यक्षात सकारायची असं मी ठरवलं. खरं तर पडद्यामागचं असं काही डोक्यात नव्हतं. त्याऐवजी तरुण उद्योजक, त्यांचा प्रवास अशा मुलाखती घ्यायच्या अशी माझी कल्पना होती. पण, लॉकडाउन सुरू झालं आणि हा विचार मागे राहिला. पण जेव्हा इरफान खान गेले, ऋषी कपूर गेले तेव्हा त्यांच्याविषयीच्या मुलाखती बघून मला प्रकर्षानं जाणवलं, की आपल्याकडे अशा मुलाखती का घेतल्या जात नाहीत, ज्यात कलाकाराच्या व्यक्तिमत्वाचा वेगळा पैलू कळेल किंवा त्याची काम करण्याची पद्धत समजेल. हा विचार डोक्यात सुरू होता. मोठ्या कलाकारांच्या सोबतीनं अनेक कलाकार काम करत असतात. त्यांच्या कामाबद्दल आपल्याला काही बघायला मिळत नाही आणि त्यातूनच 'पडद्यामागचं' ही संकल्पना सुचली. पडद्यामागचं सुरू करण्याचा मुख्य हेतू हाच होता, की पडद्यामागे अविरतपणे काम करणाऱ्या लोकांचे अनुभव, त्यांची कामाची पद्धत जाणून घेऊन एक दस्ताऐवज तयार करणं जे आपल्या मराठी कला क्षेत्रात खूप कमी दिसतं. पडद्यामागच्या कलाकारांशी गप्पा मारुन त्यांचा दृष्टिकोन जाणून घेणं एवढा साधा विचार करून या संकल्पनेला सुरुवात झाली.

  • Category : Interviews
  • Date : September 15, 2021